मालेगाव मधील सर्व शाळा,विद्यालय,महाविद्यालय 4 जानेवारीपर्यंत बंद: मनपा आयुक्त त्रंबक कासार

मालेगाव मधील सर्व शाळा,विद्यालय,महाविद्यालय 4 जानेवारीपर्यंत बंद: मनपा आयुक्त त्रंबक कासार

मनपा वृत्तसेवा: आज रविवार दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी नाशिक येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ साहेब, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासमवेत मालेगाव मनपा आयुक्त त्रंबक कासार यांची बैठक संपन्न झाली. उक्त बैठकीत मालेगाव मधील सर्व शाळा,विद्यालय, महाविद्यालय 04 जानेवारी 2021पर्यंत बंद ठेवणे बाबत निर्णय घेण्यात आला.  

माननीय पालकमंत्री महोदय यांच्या बैठकीत मनपा आयुक्त त्रंबक कासार यांनी सद्यस्थितीत मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात काही प्रमाणात कोरोणा रुग्णांची संख्या वाढन्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालेगाव ची परिस्थिती भीषण होऊ शकते असे स्पष्ट मत मांडले त्यामुळे मालेगाव मधील सर्व शाळा, विद्यालय, महाविद्यालय लगेच सुरू करणे योग्य राहणार नाही अशी बाजू मांडली. त्या अनुषंगाने सर्व दृष्टिकोनातून विचारकरून मालेगाव मनपा कार्यक्षेत्रा मधील सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय दिनांक 4 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करणे संदर्भात पुन्हा आढावा बैठक डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येऊन त्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے