RTE कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25% नोंदणीसाठी प्रक्रिया सुरू, पालकांनी लक्ष द्यावे: म.न.प.शिक्षण मंडळ मालेगाव
मालेगाव :दि: १९
RTE २५% आरक्षणातंर्गत सन २०२२-२३ साठी इयत्ता १ ली मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे त्यात मालेगांव मध्ये मध्ये एकूण ११ शाळा आहे.
खालील प्रमाणे माध्यम निहाय शाळांची यादी आहे. पालकांनी अर्ज भरतांना आणि अर्जामध्ये शाळा निवड करतांना माध्यम खात्री करूनच भरावे. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर आपणास कोणताही बदल करता येत नाही. तसेच लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आपणास शाळा बदलून मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलांचे फॉर्म भरतांना काळजी पूर्वक बिनचूक माहिती भरावी.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
माहिती भरण्यासाठी वरील लिंकचा वापर करून आपण स्वतः माहिती भरू शकता.
तसेच आपण मालेगांव महानगरपालिका समोर शिवाजी टाउन हाल मध्ये समग्र शिक्षा या ऑफिस मध्ये कॉन्टॅक्ट करू शकतो.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
सदर साईट वर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे. फॉर्म भरण्यापूर्वी एकदा वाचन करावे. साईट वर शासनाचे (जी आर) (वय मर्यादा) ( अनिवार्य कागदपत्रे ) ( हेल्प सेंटर ची माहिती) असे अनेक प्रकारची माहिती देण्यात अली आहेत.
मालेगांव महानगरपालिका हद्दीत एकूण ११ शाळा आहेत. त्यात इंग्रजी = ७ , मराठी = ३, उर्दू = ०१ ची आहेत.
१) एल.व्ही. इंग्लिश मेडियम शाळा (स्टेट बोर्ड) मालेगांव कॅम्प, = इंग्रजी माध्यम (२७२०१७००११४)
२) एल.व्ही. इंग्लिश मेडियम शाळा (सी.बी.एस.सी बोर्ड) मालेगांव कॅम्प, = इंग्रजी माध्यम (२७२०१७००११५)
३) लिटील अंजल इंग्लिश मेडियम शाळा (सी.बी.एस.सी बोर्ड) मालेगांव कॅम्प, = इंग्रजी माध्यम (२७२०१७००२१५)
४) विद्या विकास इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम शाळा (सी.बी.एस.सी बोर्ड) मालेगांव कॅम्प, = इंग्रजी माध्यम (27201700120)
५) स्वामी विवेकानंद इंग्लिशमेडियम शाळा(स्टेट बोर्ड) मालेगांव कलेक्टर पट्टा=इंग्रजी माध्यम (27201700217)
६) सेमी इंग्लिश मेडियम शाळा (स्टेट बोर्ड) सॊमवर बाजार मालेगांव कॅम्प, = इंग्रजी माध्यम (27201700119)
७) साने गुरुजी प्राथमिक शाळा मालेगांव कॅम्प, = मराठी ,मेडीयम (२७२०१७००७०४)
८) बाल विद्या निकेतन प्राथमिक शाळा मालेगांव कॅम्प, = मराठी ,मेडीयम (२७२०१७००११२)
९) मीरा आदर्श प्राथमिक शाळा मालेगांव कॅम्प, = मराठी ,मेडीयम (२७२०१७००११८)
१०) अल मिझान प्रायमरी स्कूल शाळा (स्टेट बोर्ड) द्याने मालेगांव , = उर्दु माध्यम (२७२०१७०१२१६)
११) न्यू इरा इंग्लिश मेडियम शाळा (स्टेट बोर्ड) सायने बुद्र्क मालेगांव, = इंग्रजी माध्यम (२७२०१७०३२०४)
अधिक माहिती व संपर्क साठी नाव : शादाब अहमद 9226289891
Office Time: 10:00 AM to 5:00 PM
प्रशासनाधिकारी
मालेगांव महानगरपालिका शिक्षण मंडळ.
0 تبصرے
bebaakweekly.blogspot.com