65 लाख निवृत्तीधारकांची पेन्शन वाढणार, केंद्र सरकार चा ऐतिहासिक निर्णय ची बातमी दिशाभूल करणारी. शासनाने अडचणीत असणाऱ्या इपीएस पेन्शनर्स ची खोट्या बातम्या पेरणे थट्टा थांबवावी व जगण्यासाठी किमान पेन्शन 9 हजार रुपये महागाई भत्ता सह लागू करा: कॉम्रेड राजू देसले

65 लाख निवृत्तीधारकांची पेन्शन वाढणार, केंद्र सरकार चा ऐतिहासिक निर्णय ची बातमी दिशाभूल करणारी. 
शासनाने अडचणीत असणाऱ्या इपीएस पेन्शनर्स ची  खोट्या बातम्या पेरणे थट्टा थांबवावी व  जगण्यासाठी किमान पेन्शन 9 हजार रुपये महागाई भत्ता सह लागू करा: राजू देसले

नाशिक:दि. 5 जून (प्रेस नोट)
इपीएस 95 अंतर्गत पेन्शनर्स 65 लाख सेवानिवृत्त ना पेंशन वाढणार अशी बातमी फिरत आहे. ही बातमी दिशाभूल करणारी  आहे. जो निर्णय झाला आहे तो  असा 2008  पूर्वी सेवानिवृत्त धारकाने  जर एकरकमी  कम्युटेशन रक्कम घेतली असेल तर दरमहा पेन्शन मधून वसूल करण्यात येत होती ( उदा. पेन्शन विक्री) या संदर्भात  1995 ते 2008 पर्यन्त 1/3 पेन्शन विक्री करून 100 हप्त्यात वसूल करण्याचा नियम होतो. मात्र हो 100 हप्त्याचा नियम काडून टाकण्यात आला व पेन्शन विक्री ही बंद केली होती. पेन्शनर्स संघटना मात्र या निर्णय विरोधात सातत्याने देशभर लढत होत्या व 100 हप्त्यापेक्षा जास्त वसुली सुरू होती ती बंद करण्याची मागणी करत होत्या . इपीओ  च्या CBT मेंबर ची मीटिंग  आगस्ट 2019रोजी हैदराबाद येथे झाली. त त्यात 100 हप्त्याची मुदत 180 महिने करण्याचा निर्णय घेतला होता. या चे परिपत्रक 22 फेब्रुवारी2020 रोजी काढण्यात आले व ज्या सेवानिवृत्त ने पेंशन विकली आहे. त्याचे 180 हप्ते पूर्ण झाले वर त्याची कपात बंद करून तितकी रक्कम दरमहा पेन्शन मध्ये वाढ होणार आहे व अधिक काळ झाला असल्यास फरक रक्कम मिळणार आहे  सरकार ने केलेली चूक दुरुस्त केली आहे देशभरात फक्त 6 लाख च पेन्शनर्स ला दिलासा मिळणार आहे. त्यात पेन्शन वाढीचा काहीही संबंध नाही उलट केंद्र सरकारने 100 ऐवजी 180 हप्ते वसूल करून अल्प पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्त धारकाचे आर्थिक शोषण 80 हप्ते मधून केले आहे. देशातील 70 लाख पेन्शनर्स गेली 12 वर्ष पासून इपीएस 95 पेन्शन वाढीसाठी आंदोलन करत आहेत . केंद्र सरकारने 2012 मध्ये तत्कालीन राज्य सभेचे खासदार व आजचे महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती त्या समितीने किमान पेन्शन 3 हजार रुपये महागाई भत्ता सह द्यावी व आरोग्य सुविधा उपलब्ध मोफत करून घ्या म्हणून शिफारस केली होती व 2013 मध्ये भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी आमचे सरकार सत्तेत आल्यावर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता सह लागू करू असे आश्वासन देऊन मते मिळवली मात्र आज पर्यंत 1 रु ही पेन्शन वाढ केली नाही म्हणून  आम्ही देशाचे संरक्षण करणारे सैनिकाची पेंशन वाढली  मात्र हा हा देश घडविणारे कामगार ची पेन्शनर्स ला अच्छे दिन कधी येणार? असे आंदोलन केले आहे. देशात 25 लाख कामगार ना 1 हजार रुपये पेन्शन मिळते तर  1 ते 2 हजार पर्यन्त पेंशन मिळणारे 50% सेवानिवृत्त आहेत. शासनाने अडचणीत असणाऱ्या इपीएस पेन्शनर्स ची  खोट्या बातम्या पेरणे थट्टा थांबवावी व  जगण्यासाठी किमान पेन्शन 9 हजार रुपये महागाई भत्ता सह लागू करा अशी मागणी नाशिक जिल्ह्या इपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशन वतीने संस्थापक अध्यक्ष राजू देसले, जिल्हा अद्यक्ष सुधाकर गुजराती, सचिव डी बी जोशी, चेतन पणेर,प्रकाश नाईक,  नामदेव बोराडे, नरेंद्र कांबळे, साहेबराव शिवले, शिवाजी ढोबळे, नारायण अडणे, बापू रांगणेकर आदींनी केले आहे

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے