शुभवार्ता, 12 दिवसात 45 रुग्ण कोरोनामुक्त :आयुक्त दिपक कासार.
मालेगाव मनपा (प्रेस नोट /जनसंपर्क विभाग,मनपा.
दि.8/5/2020) मालेगावकरांसह सर्वासाठी आनंदाची बातमी असून, शासनाचे सर्व प्रशासकीय विभागांची योग्य उपाययोजना, मालेगाव मनपा प्रशासन व स्वच्छता आणि आरोग्य यंत्रणांची सक्षम कर्तव्यनिष्ठ, रुग्णालयातील डॉक्टरांची टिम, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी अहोरात्र घेत असलेली मेहनत आणि वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देणारे रुग्ण याचा प्रत्यय म्हणूनच दि.26 एप्रिल पासून 7 मे पर्यंत च्या 12 दिवसात 45 रुग्ण उपचार घेऊन कोरोणामुक्त झाले असून त्यांना कोविड रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाची मालेगाव मधिल बाधित रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण खूपच दिलासादायक आहे, रुग्ण उपचारासाठी वेळेवर दवाखान्यात आले, तर त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आपल्या आरोग्य प्रशासनात आहे. उपचारासाठी दाखल रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, इतर सर्व कोरोना रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकर बरे होतील, बरे होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. सर्व यंत्रणेच्या जबाबदारी पूर्ण कार्यामुळेच आज आपल्याला निकाल दिसत आहे, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करा, सूचनांचे पालन करा,नक्कीच सर्वांना लवकर दिलासा मिळेल आणि आपण या परिस्थितीतून बाहेर पडू, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्याशी संपर्क साधावा.
कोरोना रुग्ण उपचारानंतर प्रथम दि.26 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आणि पवित्र रमजान महिन्याच्या सुरवातीलाच मालेगाव वासियांना कोरोनामुक्त होण्याची चाहूल लागून दि. 7 मे रोजी पर्यंत एकूण 45 मालेगावातील रुग्ण उपचाराअंती कोरोणा मुक्त झाले आहेत.
ज्या आजारावर चांगल्या देशांनी हात टेकले, त्याला आपण पराभूत करत आहोत, मनपा व सर्व प्रशासन शहरातील नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे, सर्व प्रशासनाच्या कामामुळे आजच्या वाईट प्रसंगात ही सुखद सोनेरी किनार लाभली असून 45 रुग्ण negative झाल्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. असे आयुक्त दिपक कासार यांनी सांगितले. तर,
जर नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व सूचना पाळल्या आपली काळजी घेतली, सामाजिक अंतर पाळले, अफवांना बळी न पडल्यास लवकरच आपण हे युद्ध जिंकून मालेगाव शहर कोरोनामुक्त करू. म्हणून प्रशासनास सहकार्य करा सूचनांचे पालन करा, आपली व आपल्या परिवाराची आणि पर्यायाने आपली गल्ली, भाग व शहराची काळजी घ्या आणि कोरोणा विरुद्धच्या युद्धात एक कोरोणा स्वयंसेवक सैनिक म्हणून घरी राहूनच सहभागी व्हा. असे मत महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशासन तथा इन्सिडंट कमांडर नितीन कापडणीस,
यांनी व्यक्त केले.
असे मनपा आयुक्तां मार्फत काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.
0 تبصرے
bebaakweekly.blogspot.com