मालेगाव शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सुरू
मालेगाव शहर हे माझे कुटुंब आहे:_महापौर ताहेरा रशीद शेख यांचे शहरवासीयांना भावनिक आवाहन_
प्रेसनोट:(आरोग्य विभाग):
मनपा वृत्तसेवा: माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत कोविड बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी TRACE-TRACK-TREAT (ट्रिपल टी)या त्रिसूत्री चा वापर करून कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि कोविड मृत्यूदर कमी करण्यासठी संपूर्ण राज्य भर “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हि मोहीम राबविण्यात येत आहे.
मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.२५ सप्टेंबर 20 पर्यंत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हि मोहीम राबवण्यात येणार आहे. मालेगाव शहराची लोकसंख्या ६,५३,१९८ च्या जवळपास असून त्यातील एकूण कुटुंब संख्या हि १,१०,४८९ इतकी आहे.त्याकरिता मनपामार्फत एकूण ३४१ पथक (teams) “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेसाठी तयार केले आहेत. त्यानुसार प्रत्येक पथकासाठी ७५ घरांच्या सर्वेक्षणाचे प्रतिदिवस इतके उद्दिष्ठ असणार आहे. या आरोग्य पथकामध्ये प्रत्येकी १ आशा सेविका, १ स्थानिक प्रतिनिधींचे स्वयंसेवक व २ शिक्षक असणार आहेत. प्रत्येक पथक दररोज ६५ ते ७५ घरांना भेटी देऊन घरातील सर्व सदस्यांचे तापमान SpO2 तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती घेणार आहे. ताप, खोकला, सर्दी, दम लागणे , SpO2 कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या मनपा नागरी आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करण्यात येईल व कोविड १९ प्रयोग शाळा चाचणी करून पुढील उपचार केले जातील. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे १ डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देणार आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेची रूपरेषा - ॲक्शन प्लॅन खालील प्रमाणे असणार आहे.
मोहिमेसाठी मालेगाव महापालिकेचा ॲक्शन प्लॅन
१ .मोहिमेचे उद्दिष्ट:* मालेगाव महानगरपालिका, कार्यक्षेत्रातील गृह्भेटीद्वारे अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड १९ प्रतिबंधासाठी प्रशिक्षण देणे. गृहभेटीद्वारे प्रत्येक व्यक्तीची नोंदणी व कोविड १९ बाबत आरोग्य शिक्षण.
२ मोहीम कालावधी:* दि. २५ सप्टेंबर २०२० पर्यंत.
३ “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम ३४१ पथक: पथकामध्ये प्रत्येकी १ आशा सेविका, १ स्थानिक प्रतिनिधींचे स्वयंसेवक व २ शिक्षक असणार आहेत.
४ गृह भेटी-फेरी पहिली: घरातील प्रत्येक व्यक्तीची app मध्ये नोंदणी करण्यात येईल तसेच तापमान SpO2 मोजून त्याची नोंदणी करण्यात येईल. घरातील व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग , कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दम इ.आजार आहेत का याची माहिती घेऊन नोंद करण्यात येईल. तसेच तापमान जास्त असल्यास किंवा कोविड अदृश्य लक्षणे असल्यास जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात तपासणी करून संदर्भित करण्यात येईल.
५ गृह भेटी – फेरी दुसरी: घरातील व्यक्तींचे तापमान SpO2 मोजूण्यात येईल तसेच पहिल्या भेटी दरम्यान गैरहजर असणाऱ्या व्यक्तींची माहिती नोंदणी करण्यात येईल.
६ मोहिमे दरम्यान द्यावयाचे संदेश :* भेटी दरम्यान व्यक्तींना कोविड संसर्गापासून संरक्षण व्हावे यासाठी सूचना व संदेश देण्यात येतील.
महापालिका प्रशासनाचे आवाहन :-
अ)सर्वसामान्य नागरिक/ व्यक्ती :-
सतत मास्क घालून राहावे. मास्कशिवाय तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये.
दर २-३ तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावेत. हात धुण्यासाठी सोय नसलेल्या ठिकाणी सॅनिटायझर चा वापर करावा.
नाक तोंड डोळे यांना हाथ लाऊ नये.
कोवीड मुळे होणारी गुंतागुंत व मृत्यू टाळण्यासाठी ताप आल्यास तसेच सर्दी/खोकला/घसा दुखणे/खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी.
मधुमेह/हृदय विकार/किडनी आजार/लठ्ठपणा इ.असल्यास दररोज तापमान मोजावे व तापमान ९८.७०F (३७.c) पेक्षा जास्त आढळल्यास फिवर क्लिनिक मधे तपासणी करावी व सध्या असलेल्या आजाराचे उपचार सुरु ठेवावे.
ब) कोविड पॉझीटिव्ह व्यक्ती होम आयसोलेशन मध्ये घरी राहणाऱ्या व्यक्ती किंवा रुग्णालयातून १० दिवसानंतर ७ दिवस होम आयसोलेशन मध्ये असणार्या व्यक्ती:-
सतत मास्क वापरावा.
खोलीच्या/घराच्या बाहेर पडू नये
दर दोन तासांनी स्वच्छ् हात धुवावेत.
स्वतंत्र शौचालय/बाथरूम व जेवणाची भांडी वापरावीत.
कपडे स्वतंत्र पणे धुवावेत
ताप आल्यास/थकवा जाणवल्यास त्वरित फिवर क्लिनिक मध्ये जावे.
क) होऊन गेलेले व्यक्ती (रुग्णालयातून येऊन होम आयसोलेशन पूर्ण झालेले व्यक्ती):-*
कोविड १९ आजार होऊन गेला म्हणून वैयक्तिक प्रतिबंधाच्या बाबींमध्ये दुर्लक्ष करू नये.
• मालेगाव शहर हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची (शहराची) माझ्यावर जबाबदारी असून सर्व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी (नागरिकांनी) आपली जबाबदारी ओळखून शहर आरोग्यमय करण्यासाठी मला सहकार्य करावे असे भावनिक आवाहन वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा रशीद शेख यांनी शहरवासीयांना केले. तर शहरातील नागरिकांना “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमास प्रतिसाद देऊन स्वतः सहभागी व्हावे व येणाऱ्या मनपाच्या आरोग्य पथकांना संपुर्ण सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन महापौरांनी केले आहे.
मालेगाव शहरासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी “ मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली असून महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस,उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास दोरकुळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे , विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी उपस्थित होते. महापालिकेद्वारे शहरातील जनतेला आवाहन करण्यात येते कि “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या व्यापक मोहिमेस प्रतिसाद देऊन आपले मालेगाव शहर आरोग्यमय करण्यास प्रशासनास सहकार्य करावे.
0 تبصرے
bebaakweekly.blogspot.com