लॉकडाऊनमुळे वंचित कामगारांना संपूर्ण वेतन अदा करण्याचे आदेश
अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापना विरोधात तक्रारीचे आवाहन
: डॉ.पंकज आशिया
*मालेगाव, दि. 18 (उमाका वृत्तसेवा)* : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह संपुर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊची प्रभावी अंमलबजावणी करतांना ज्या खाजगी आस्थापना, कारखाने, दुकाने इ. आस्थापनांचे सर्व कामगार ज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याकरिता कामगार, कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशामुळे घरी, स्थानबध्द रहावे लागत आहे. अशा सर्व कामगार, कर्मचारी हे कर्तव्यावर असल्याचे समजण्यात यावे व त्यांना संपुर्ण वेतन भत्ते अदा करणेबाबत शासनाने 31 मार्च, 2020 च्या शासन निर्णयानुसार यापुर्वीच आदेशीत केले आहे.
या शासन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मालेगावातील शहरी भागासाठी महानगरपालिकेत तर तालुक्याकरिता तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक 9421501955 व 9923555689 असे आहेत. तरी यासंदर्भात कामगार, मंजूर वर्गाच्या काही तक्रारी असल्यास या कक्षातील अधिकाऱ्यांकडे करण्याबाबत घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी कळविले आहे.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त नाशिक यांच्या अधिपत्याखाली हे दोनही कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून या कक्षात प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या नोंदी घेण्यात याव्या. प्राप्त तक्रारींवर उचीत कायदेशीर कार्यवाही करण्याच्या व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सुचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
0 تبصرے
bebaakweekly.blogspot.com